स्त्रियांसाठी वरदान

100

संविधान.

शीर्षक :-स्त्रियांसाठी वरदान

भारतीय संविधान

स्त्रियांसाठी वरदान

बाबा साहेब जनक

आम्हां वाटे अभिमान..||१||

 

सर्वांच्याच हितासाठी

त्यांनी कलमे लिहिली

दिले स्त्रियांना जीवन

घटनेत नोंदविली..||२||

 

स्त्रीचे जीवन नरक

हुंडाबंदी सती प्रथा

घटनेत दिले स्थान

जाणुनीया स्त्रीच्या व्यथा||३||

 

संविधान महाग्रंथ

घटनेचे शिल्पकार

बाबा साहेब महान

महायोद्धा ग्रंथकार..||४||

 

न्याय मूल्यांचे जतन

जात पात पंथ धर्म

संविधान हा जागर

करू आदर सत्कर्म..||५||

 

हक्क दिधले स्त्रियांना

सव्विसदि नोव्हेंबर

संविधान जन्मदिन

आनंदाची ही खबर..||६||

सौ.स्मिता गणेश पाटील, रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here