
सेवा सहकारी संस्था नवेगाव माल या संस्थेवर कार्यवाही करा.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना पीडित शेतकऱ्यांचे निवेदन

कर्ज घेतलेले नसतानाही कर्ज माफी योजनेत नाव समाविष्ट करणाऱ्या सेवा सहकारी संस्था नवेगाव (माल) ची चौकशी करा
कर्जमाफीचा लाभ झालेल्यानाही प्रोत्साहन लाभ देण्याचा प्रयत्न
कर्जाची रक्कम कमी मात्र प्रोत्साहन लाभ घेताना जास्त रक्कम दाखविली
गडचिरोली(Chamorshi-Gadchiroli )सेवा सहकारी संस्था नवेगाव माल रजिस्टर नंबर १३११ तालुका चामोर्शी या संस्थेने सोसायटी मधून कर्ज घेतलेले नसतानाही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये शेतकरी शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट करून प्रचंड मोठा घोळ केलेला आहे. त्यामुळे या संस्थेची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले आहे.सेवा सहकारी संस्था नवेगाव माल या सोसायटी मधून शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही तरीही त्यांचेही नाव कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्यावर त्यांचेच नाव प्रोत्साहन पर लाभ मिळणाऱ्या अनुदान यादी मध्येही समाविष्ट करण्यात आले. कर्जाची रक्कम कमी असताना प्रोत्साहन लाभ मात्र जास्त रकमेचा दाखवून उचलण्यात आलेला आहे. बँकेतून २०१९-२० मध्ये एकदाच कर्जाची उचल केलेली असतानाही अशा अपात्र लाभार्थ्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. अशा प्रकारे या सहकारी संस्थेने कर्जमाफी योजनेमध्ये प्रचंड गैरप्रकार करून स्वतःच लाभ घेत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या संस्थेची तातडीने चौकशी करून तो कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे करण्यात आली आहे.