समता पर्व मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांच्याकरीता कार्यशाळा

54

समता पर्व मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांच्याकरीता कार्यशाळा

 

गडचिरोली,(Gadchiroli)दि.01: गडचिरोली जिल्हातील सर्व ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांना कळविण्यात येते की, शासनाच्या परिपत्रकानुसार दि. 26/11/2022 ते 06/12/2022 या कालावधीत समाज कल्याण विभागामार्फत समता पर्व आयोजीत करण्यात आलेले आहे. त्याचे औचित्य साधुन ज्येष्ठ नागरिक , दिव्यांग व तृतीयपंथी यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा दि. 03/12/2022 रोजी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व तृतीयपंथी यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली, अमोल यावलीकर यांनी केले आहे. कार्यालय संपर्क क्र. 07132- 222192

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here