सखी वन स्टॉप सेंटर कडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

105

सखी वन स्टॉप सेंटर कडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

गडचिरोली,()दि.06: सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर ‘महापरिनीर्वान दिन’ तथा ‘समाजिक समरसता दिन’ निमीत्य माल्याअर्पन करुन प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना विनोद पाटील,जिल्हा परीविक्षा अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनात बाबासाहेबांचे विचार केवळ 14 एप्रिल व 6 डिसेंबर पूर्ती मर्यादीत न ठेवता नित्यआचरणात आणले पाहिजे असा उल्लेख केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला व 6 डिसेंबर 1956 रोजी ते अनंतात विलीन झाले. त्या दिवसाला संपूर्ण जग ‘महापरिनीर्वान दिन’ म्हणून साजरा करतो तथा ‘समाजिक समरसता दिन’ दिन म्हणून साजरा करीत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले जाते. आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांनी दलीतांसाठी विस्तृत व महान कार्य केले तसेच जगातील सगळ्यात मोठी व विस्तृत राज्यघटना तयार करुन ‘राज्यघटनेचे शिल्पकार’असे नाव लौकीक प्राप्त केले. अशा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.

कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परीविक्षा अधिकारी, विनोद पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली तसेच सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली, केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here