संविधान दिन

86

संविधान दिन

स्वतंत्र झाले भारत जरी मिळाले नाहीत अधिकार

संविधान लागू झाले तेव्हा

जनतेचे स्वप्न झाले साकार

संविधानाने मिळवून दिले

मुलभूत हक्क, अधिकार

कायदे लागू झालेत सर्व

बाबा साहेबांचा जयजयकार

बाबा साहेबच संविधानाचे

खरे खुरे एकमेव शिल्पकार

देशाच्या प्रगतीसाठी लढले

बहुजनांचा केला उद्धार

वंदन त्या महामानवाला

ज्याने लिहिले संविधान

खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो

चालतो ठेवून ताठ मान

जागर करावा संविधानाचा

ज्याने मिळवून दिला न्याय

दूर केला अंधार जीवनातला

इंग्रजांचा होणारा अन्याय

संविधानाविषयी जागृती

लोकांमध्ये व्हावा प्रचार

संविधान दिन साजरा होई

बाबासाहेबांचे मान्य विचार.

हर्षा भुरे, भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here