शिक्षकांनी शिक्षक मतदारसंघात आपली नोंदणी करावी – पदनिर्देशित अधिकारी, नागपूर शिक्षक मतदार संघ महेंद्र गणवीर

101

शिक्षकांनी शिक्षक मतदारसंघात आपली नोंदणी करावी – पदनिर्देशित अधिकारी, नागपूर शिक्षक मतदार संघ महेंद्र गणवीर

 

गडचिरोली,दि.10: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये येणाऱ्या काळात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली असल्याने गडचिरोली तालुक्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षण शाळा पेक्षा कमी दर्जा नसलेल्या शाळांमध्ये शिकवत असलेल्या सर्व शिक्षकांनी मतदार नोंदणी नमुना-19 भरुन करावी असे आवाहन तहसिलदार तथा पदनिर्देशित अधिकारी, नागपूर शिक्षक मतदार संघ महेंद्र गणवीर यांनी केले. गडचिरोली तहसिल कार्यालयाच्या सभागृहामध्ये तालुक्यातील खाजगी अनुदानीत, विना अनुदानीत, जिल्हा परिषद व कॉन्व्हेंट येथील माध्यमिक शाळा पेक्षा कमी दर्जा नसलेल्या सर्व शाळामधील मुख्याधापक व प्राचार्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शिक्षक मतदारसंघाचा फॉर्म भरताना मुख्याधापक, प्राचार्य यांनी कोणती काळजी घ्यावी व फॉर्म कसा भरावा यासाठी सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. कोणताही शिक्षक मतदानापासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घ्यावी असे सांगितले. सात नोव्हेंबर पर्यत तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये आपले फॉर्म प्राचार्य, मुख्याधापकाच्या प्रमाणपत्रासह सादर करावे, असेही आवाहन केले. तसेच गडचिरोली तालुक्यामधील स्थाई असलेल्या व माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या सर्व शिक्षण संस्था मध्ये 01 नोव्हेंबर 2022 पासून 6 वर्षात, तीन वर्ष शिकवत असलेल्या सर्व शिक्षकांनी नमुना -19 भरुन त्यासोबत मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र व रहिवासी पुरावा जोडुन आपली मतदन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी या मार्गदर्शन सभेला तहसिलदार महेंद्र गणवीर, नायब तहसिलदार दिपक गठ्ठे, प्रियंका मानकर, ज्ञानेश्वर ठाकरे, तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली नरेंद्र बेंबरे (पदनिर्देशित अधिकारी) उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्यातील बहुसंख्य प्राचार्य व मुख्याधापक उपस्थित होते. असे पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदार, गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here