शासकीय कार्यालयात महीलेचा विनयभंग करणा-या नराधमास गोपनीय, व तांत्रीक तपासाच्या आधारे अवघ्या २ तासात पोलीसांनी ठोकल्या बेडया

583

कार्या.उप. पो. अधि. गड दिनांक २१/११/२०२२

शासकीय कार्यालयात महीलेचा विनयभंग करणा-या नराधमास गोपनीय, व तांत्रीक तपासाच्या आधारे अवघ्या २ तासात पोलीसांनी ठोकल्या बेडया.

गडचिरोली :- Gadchiroli :- यातील पिडीत महीला हि जिल्हा परीषद गडचिरोली येथे वरीष्ठ सहायक (लेखा) येथे नौकरीवर असुन त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणुन कर्तव्यावर असलेले आरोपी नामे- ओंकार रामचंद्र अंबपकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली हा पिडीतेस कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्याचे कार्यालयात बोलावुन पिडीतेचा नेहमी विनयभंग करीत होता दिनांक १६/११/२०२२ ते २०/११/२०२२ रोजी पर्यंत पिडीतेस लेझर काढण्यासाठी चार पाच वेळा कॅबिनमध्ये बोलाविले पिडीता लेझरचे काम करून दाखवित असताना नमुद आरोपी यांनी पिडीत महीलेस लेझर मधील फायनल झालेल्या प्रस्तावामधील पुर्ण रक्कम ही दुरुन वाचून दाखवु नको मला दिसत नाही, असा बहाणा करुन पिडीतेचा डावा हात खिचुन त्यांचे बसलेल्या खुर्चीजवळ ओढुन पिडीतेच्या कमरेला, छातीला दाबुन जबरदस्तीने गालाचा किस घेतला, कमरेल हात टाकुन माझ्या सिटला, पोटाला कमरेला दाबुन पोटाला चिमटे घेतले, पिडीतेने प्रतिबंध केला असता आरोपीने पिडीतेचा सीआर खराब करुन, नोकरीवरुन काढुन टाकण्याची धमकी देवून असहयतेचा फायदा घेवून विनयभंग करीत होता अशा पिडीतेच्या तक्रार वरुन पोस्टे गडचिरोली येथे आरोपी नामे ओंकार अंबपकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली यांचे विरुध्द विवीध कलमान्वये व अनु.जा.ज. अत्या. प्रति अधिनीयम प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

गुन्हयातील आरोपी नामे- ओंकार रामचंद्र अंबपकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली हा चंद्रपुर रोड, गडचिरोली लॅन्डमार्क हॉटेल जवळील परीसरात लपुन बसला असल्याची गोपनीय माहीती व तांत्रीक पुराव्याच्या आधारे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीस दिनांक २२/११/२०२२ रोजी न्यायालयात पोलीस कोठडी रिमांड कामी हजर करण्यात येणार आहे

पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल , मा. अपर पोलीस अधिक्षक सा, गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली मा. प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी  गडचिरोली हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here