शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे सिकलसेल तपासणी शिबीर

107

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे सिकलसेल तपासणी शिबीर

गडचिरोली – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे , आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिरात एकुण 361मुला मुलींची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 62 विद्यार्थी सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळले.

या शिबिरात सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले.शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर कार्ड वाटप करण्यात येतील . शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे, सुषमा आत्राम, सुहासिनी गेडाम, अंजली चौधरी, प्रिया मेश्राम सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here