शब्द माझ्या काव्यातले..

67

शब्द माझ्या काव्यातले..

 

यातना कठीण सहवास माझा

माझे हे प्रेम छळलेले,

कमी नाही पडणार तुला

प्रेम सांगणारे शब्द माझ्या काव्यातले,

 

दूर अशी तू माझ्यापासून

आठवणीतून मन माझे जळलेले,

स्वप्नातून येऊन सांगतात तुला

माझ्या वेदना शब्द माझ्या काव्यातले,

 

प्रेमाचे या प्रवासाला

सुरुवात तुझ्यापासून झालेले,

साक्ष देतात मित्र माझे

तू माझी आहेस शब्द माझ्या काव्यातले,

 

वंचित नयन माझे

तुला पाहण्यासाठी बसलेले,

कधी येणार सांग तू मला

वाट पाहतात शब्द माझ्या काव्यातले,

 

बदलतात ऋतू चार महिन्याला

लक्षात राहतात नुकसान केलेले,

ऋतूंची उपमा घेऊ नकोस

सांगताहेत शब्द माझ्या काव्यातले,

 

लिहून किती लिहायचं तुझ्यावरती

दिसत आहे मला तुझे मन बदललेले,

माझ्याशी बोलताना अडकलेले

शब्द सांगताहेत मला माझ्या काव्यातले….

 

कवी भरत खनगावकर (सुरूते चंदगड)

9880330147

दिनांक 13/09/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here