
3 years rigorous imprisonment and 26,000/- Rs. Punishment of fine, Judgment of Chief District and Sessions Judge of Gadchiroli, Shri. Uday Ba.shukl

विनयभंग करणाऱ्या आरोपीस 3 वर्ष सश्रम कारावास व 26,000/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा ,गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय
गडचिरोली Gadchiroli :- सविस्तर वृत्त असे कि, यातील आरोपी नामे दिपक एकनाथ कुमरे वय 24 वर्ष रा. बोरीचक ता. आरमोरी जि. गडचिरोली यांने दिनांक 01/10/2019 रोजी यातील फिर्यादी वय 30 वर्ष ही व त्याचे सोबतीला तिची सासू व इतर चौघीजणी मातोश्री शाळा पिसेवळधा येथे अंदाजे 11.00 वा. दरम्यान मजुरीच्या कामावर असतांना दुपारी 01.00 वा. दरम्यान एक अनोळखी इसम तिथे आला. व त्यांना आम्ही 19 लोक आहोत बाकी सर्व लोक गावाबाहेर थांबले आहेत तुम्ही आम्हला जेवन बनवुन द्या, नाहीतर तुम्हाला ठार मारतो असे म्हणाल्याने घाबरून स्वयंपाक बनविण्या करीता तयार झालो. तेव्हा आरोपी हा फिर्यादी कडे बोट दाखवुन फक्त तु चल असे बोलला म्हणुन फिर्यादीच्या सासुने ती एकटी कशी जाईल म्हणुन तिच्या सोबत एकीला पाठविले. तेव्हा तुम्ही म्हाताऱ्या बाया ईथेच थांबा कुणालाही काही सांगु नका सांगाल तर ठार मारतो असे बोलला. फिर्यादी व तीची सोबती त्याचे सोबत घरी गेले असता आरोपीने घरात घुसून घराचे दार बंद केले व फिर्यादीच्या सोबतीला असणाऱ्या स्त्रीला तु घराचे बाहेर जा असे म्हणाला पण ती बाहेर गेली नाही. त्याने तीच्या समोरच फिर्यादीला बेडवर पाडुन कपडे सोडण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा दोघींनी जोरात आरडा ओरड केल्याने तो फिर्यादीचा गळा दाबुन पळुन गेला. थोडया वेळाने गावात धावा धावा पकडा असे ओरडत असतांना दिसले तेव्हा गावात काय प्रकार आहे हे पाहण्याकरीता बाहेर आले तेव्हा फिर्यादी सोबत अतिप्रसंग करणाऱ्या इसमाला पकडुन पोलीस पाटील यांचे घरी घेवुन गेले. त्याच दिवशी गावातीलच दुसऱ्या महिलेवर पुन्हा अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपी विरोधात पोलीस स्टेशन धानोरा अप.क्र. 79/2019 कलम 307,305,354 (अ), 354 (ब), 341, 448,506 भादवी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला दिनांक 02/10/2019 रोजी अटक करण्यात आला,पोलीस यंत्रणेने तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून आज दिनांक 14/12/2022 रोजी आरोपी नामे दिपक एकनाथ कुमरे वय 24 वर्ष रा. बोरीचक ता. आरमोरी जि. गडचिरोली यास मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांनी कलम 354 (ब) भादवी कायदयान्वये दोषी ठरवुन 3 वर्ष सश्रम कारावास व 10,000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. द्रव्यदंडापैकी 20,000/- हजार रूपये नुकसान भरपाई म्हणुन पिडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास मसपोनि / अंजली मेवासींग राजपुत पोस्टे धानोरा यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.