विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हे आपले स्वप्न MLA Dr.devrao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

58

विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हे आपले स्वप्न MLA Dr.devrao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १३६ गावांमध्ये १२७ पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर

जलजीवन मिशन अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील नवरगाव भाडभिडी (मोकासा) जोगना, नवतळा , पलासपूर, हळदवाई ,हळदवाई टोला, भाडभिडी (बी) , नेताजी नगर व भोगनबुडी हेटी, येथील पाणीपुरवठा योजनांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते भूमिपूजन

गडचिरोली  gadchiroli दि २४ :-गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला पिण्याचा शुद्ध पाणीपुरवठा व्हावा व प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आपण प्रयत्न करीत असून त्याच प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १३६ गावांमध्ये १२७ पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झालेल्या असल्याची माहिती चामोर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.याप्रसंगी भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्राध्यापक रमेशजी बारसागडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे,गावातील सरपंच, यांचेसह भाजपा पदाधिकारी , पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे ४८, लक्ष ८४ हजार ७४७ रुपये, भाडभिडी (मोकासा) येथे १३, लक्ष ४१ हजार ५९० रुपये, जोगना नवतळा तुकुम् येथे ३०, लक्ष २२ हजार ८९ रुपये, पलासपूर येथे ७२ लक्ष ३८हजार ०५ रुपये, हळदवाई -हळदवाई टोला येथे ८३ लक्ष ७१ हजार ३६१ रुपये, भाडभिडी (बी) ,६८ लक्ष ५७ हजार २९६ रुपये, नेताजीनगर येथे १ कोटी १० लक्ष ७४ हजार ८६० रुपये भोगनबुडी हेटी येथे ८४ लक्ष ८१ हजार १३० रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले.विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला व प्रत्येक घराला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हे आपले ध्येय असून ते ध्येय उराशी बाळगून आपण पाणीपुरवठा योजनांचे काम मंजूर करून आणण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here