वडीलांना जबर मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

584

वडीलांना जबर मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा,मुलाची पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासनाकडे मागणी

Take strict action against those who beat elders,The request of the boy from the press conference to the police administration

गडचिरोली २७ :- जागेच्या कौटुंवडीलांना जबर मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई कराबिक वादातून पुतण्याने आपल्या काकाला जबर मारहाण केल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे घडली. याप्रकरणी पोलीसांनी अद्यापही दोषीवर कारवाई केलेली नाही. माझ्या वडीलांना मारहाण करणारा मोरेश्वर वलादे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुलाब शिवदास वलादे यांनी आज मंगळवारी गडचिरोली येथील विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

 

गुलाब वलादे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझे वडील शिवदास वलादे आणि मोरेश्वर वलादे हे नात्याने काका पुतण्या आहे. आम्ही एकमेकांच्या शेजारी राहतो. माझ्या वडीलांनी मालकी हक्काच्या जागेत घराला लागून सिमेंट पत्राचे शेड तयार केलेले आहे. मोरेश्वर वलादे हा दारू पिऊन नेेहमी भांडण करीत असतो. २५ जून रोजी मोरेश्वर वलादे याने दारू पिऊन माझ्या जागेत शेड कसे काय तयार केले असे बोलून दारू पिऊन माझ्या वडीलांशी वाद घातला आणि शिविगाळ करून हाता बुक्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीमुळे माझ्या वडीलांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे माझ्या वडीलांना जबर मारहाण करून जखमी करणाऱ्या मोरेश्वर वलादे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुलाब वलादे यांनी पत्रकार परिषदेतून केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here