
लोकांच्या सहभागातून विकास होणे ही ग्रामीण विकासाची पहिली पायरी आहे; अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले

गडचिरोली (gondwana university)दि:५कृषी मालावर प्रक्रिया तसेच कृषी मालाचे पॅकिंग करून विकला तर ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळेल .तरुणांचा कल शेतीकडे दिसत नाही कारण तरुण मुलांचे विचार करण्याची शक्ती ही बदलवण्याची गरज आहे . लोकांच्या सहभागातून विकास होणे ग्रामीण विकासाची पहिली पायरी आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अर्थतज्ञ नागपूर डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वातंत्र्याचे ७५ वर्ष आणि आधुनिक ग्राम विकासाची दिशा’ या विषयावर बोलताना केले.गोंडवाना विद्यापीठ, पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभाग आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे , प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन , कार्याध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद डॉ. निवृत्ती पिस्तुलकर ,सचिव, विदर्भ अर्थशास्त्र परिषद डॉ. विठ्ठल घिनमिनेआदी उपस्थित होते.स्वातंत्र्याचे ७५ वर्ष ,उपयोजित अर्थशास्त्रामध्ये असलेले असलेला क्रॉपिंग पॅटर्न, स्त्रियांचा शेतीमध्ये सहभाग आणि तरुणांची शेती विषयाची बदलती मानसिकता या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, भारतीय अर्थशास्त्र हे सर्व अंगाने स्पर्श करणारे अर्थशास्त्र आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्व सोयीसुविधांशिवाय प्रगती शक्य नाही.असे ते म्हणाले विद्यापीठाची महत्त्वाची जबाबदारी असते की त्या भागाचा विकास करणे कारण शिक्षणासोबतच त्या भागातील मानवी विकास व्हावा ही विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठी विद्यापीठाने गौणवनउपज प्रकल्प ,वैदू चिकित्सालय, व्यसनमुक्ती साठी स्पार्क अभ्यासक्रम,येणाऱ्या दिवसामध्ये पाणी वाटप परिषद होणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले.विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. निवृत्ती पिस्तूलकरयांनी मनोगत तर प्रास्ताविक उपयोजित अर्थशास्त्र विभागाच्या समन्वयक डॉ. शिल्पा आठवले यांनी , संचालन डॉ.स्मिता लाडे यांनी तर आभार डॉ. रमेश राठोड यांनी मानले. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी उपयोजित अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.