लोकशाहीत मतदारांना त्यांनी मतदान केलेल्या उमेदवारांच्या पार्श्‍वभूमीची माहिती मिळण्याचा अधिकार आहे,राजीव कुमार  भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

78

In a democracy, voters have the right to know the background of the candidates they vote for.Rajiv Kumar Chief Election Commissioner of India

santoshbharatnews new Delhi  :-लोकशाहीत मतदारांना त्यांनी मतदान केलेल्या उमेदवारांच्या पार्श्‍वभूमीची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. यास्तव, मतदारांना माहितीपूर्ण निवडी करण्यास सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कारणास्तव, उमेदवारांविरुद्ध काही फौजदारी खटले प्रलंबित असल्यास ते वर्तमानपत्रात सूचित केले पाहिजेत. तसेच, प्रत्येक राजकीय पक्षाला त्याच्या जाहिरनाम्यात कल्याणकारी उपायांचे आश्वासन देण्याचा अधिकार असला तरी , मतदारांना सार्वजनिक तिजोरीवर त्यांचे होणारे आर्थिक परिणाम जाणून घेण्याचा तितकाच अधिकार आहे.  लोकशाहीत हिंसेला स्थान नसावे. पैशाच्या ताकदीला आळा घालणे हे निवडणुकीतील मोठे आव्हान आहे. मतदारांना देण्यात येणा-या प्रलोभनेचे प्रमाण काही राज्यांमध्ये इतरांपेक्षा अधिक तीव्रतेने जाणवते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या कडक दक्षतेमुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विक्रमी प्रमाणात जप्ती झाली असली, तरी लोकशाहीत प्रामाणिक आणि जागरुक मतदारांना पर्याय असू शकत नाही. C-Vigil सारख्या मोबाईल अॅप्सने सर्वसामान्य नागरिकांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या घटनांची तक्रार करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे निवडणूक निरीक्षकांना गुन्हेगारांविरुद्ध त्वरित कारवाई (100 मिनिटांच्या आत) सुरू करण्यात मदत झाली आहे.    प्रत्येक निवडणुकीपूर्वी शेकडो बनावट मीडिया व्हिडिओ/ बनावट साहित्य प्रसारित केले जाते. शेल्फ-लाइफच्या (साठवण कालावधी) अनुपस्थितीत, निवडणुका संपल्यानंतर ते रेंगाळत राहतात, विशेषत: जे निवडणुकीच्या मुख्य कार्यक्षेत्रावर हल्ला करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या प्रचंड कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांचा वापर, कमीत कमी, अशा स्पष्ट विकृत माहितीच्या प्रयत्नांना इशारा देण्यासाठी सक्रियपणे करतील अशी अपेक्षा जगभरात वाढत आहे. मुक्त भाषणासह मोकळ्या जागांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सह-सामायिक आहे. खोट्या बातम्यामुळे निवडणूक व्यवस्थापन यंत्रणाचे काम अधिक अवघड होते ही बाब विचारात घेता , त्या मध्ये जास्त लक्ष देणे व स्वत:मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.  राष्ट्रीय मतदार दिवस निवडणुका सर्वसमावेशक, सहभागी, मतदार अनुकूल आणि नैतिक बनवण्यासाठीचे भारत निवडणूक आयोगाच्या संकल्पाचे प्रतीक आहे. 13व्या राष्ट्रीय मतदार दिवस (2023) चे घोष वाक्य “मतदान करण्यासारखे दुसरे काही नाही, हमखास मतदान करु” अशी आहे. हे असे घोष वाक्य आहे जे मतदारांच्या कल्पनेला चालना देऊ शकेल. जेव्हा नागरिक त्यांच्या नागरी कर्तव्याचा भाग म्हणून मतदार असल्याचा अभिमान बाळगतात, तेव्हा त्याचा परिणाम प्रशासनाच्या पातळीवर नक्कीच जाणवतो, त्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा.

मतदार दिनाच्या शुभेच्छा.

राजीव कुमार  भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here