रेती तस्करी, अतिक्रमण पट्टे अशा विविध मुद्द्यांसह गाजली चामोर्शीची वार्षिक आमसभा शासनाच्या योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची दिले निर्देश

93

रेती तस्करी, अतिक्रमण पट्टे अशा विविध मुद्द्यांसह गाजली चामोर्शीची वार्षिक आमसभा

शासनाच्या योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची दिले निर्देश

Chamorshi :- चामोर्शी तालुक्यातील घरकुलधारकांना रेती न देता अवैद्य रेती तस्करीचे वाढलेले प्रमाण , अतिक्रमित जमीन धारकावर कार्यवाही करून करण्यात येत असलेला अन्याय अशा विविध मुद्द्यांसह चामोर्शीची आमसभा गाजली. यावेळी आमदार महोदयांनी सभेला अनुपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर व शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले.*

 

*मा. आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या या आमसभेला जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा.रमेशजी बारसागडे, भाऊरावजी डोर्लीकर माजी सभापती, वंदना गौरकर माजी उपसभापति, आकुली बिस्वास माजी उपसभापति, तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, जिल्हयाचे युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूरेशजी शहा, तालुका महामंत्री भोजराज भगत , साईनाथजी बुरांडे, प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्वांनी सहकार्याने मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादित केले. घरकुलधारकांना ५ ब्रास मोफत रेती देण्याचे शासनाचे निर्देश असताना देखील त्याची अंमलबजावणी न करता रेती तस्करांना मात्र सहकार्य होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. दोटकुली येथील घाटावरून होत असलेली अवैद्य रेतीची तस्करी उघडकीस आणून सुद्धा त्यावर योग्य प्रकारे कारवाई न होणे हे गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. आमसभेला शंभर टक्के उपस्थिती राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश असताना देखील काही लोक जाणीवपूर्वक येण्याचे टाळतात अशा अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here