राष्ट्रीय जंतनाशक मोहिमचे उद्घाटन

123

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमचे उद्घाटन

 

गडचिरोली,दि.10: राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दिनांक 10 ऑक्टेांबर 2022 ला गडचिरोली जिल्हयात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिना 10 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा परिषद शाळा/अंगणवाडी नवेगांव तालुका गडचिरोली येथे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली, राजेंद्र भुयार यांचे हस्ते बालकांना अलबेंडाझोल (जंतनाशक ) गोळी खाऊ घालून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनास अति.जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.गडचिरोली,डॉ.संजयकुमार जठार,डॉ.सुनिल मडावी,सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.सुनिल मडावी, नवेगावाचे सरपंच दशरथ चांदेकर,शाळा समितीचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका,जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच शाळेचे विद्यार्थी व अंगणवाडीचे बालके उपस्थित होते.या कार्याक्रमास शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद दिसुन आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here