रस्ता वाहतूक करताना शीट बेल्ट आणि हेल्मेट वापरा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले यांचे आवाहन

52

रस्ता वाहतूक करताना शीट बेल्ट आणि हेल्मेट वापरा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले यांचे आवाहन

 

गडचिरोली,(Gadchiroli) दि.21 : आरमोरी येथे होमगार्ड उपपथक कार्यालय यांच्या माध्यमातून आज दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ता सुरक्षा आणि रस्त्याची वाहतूक याविषयी मार्गदर्शन करताना गडचिरोली येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले हे उपस्थित होते. या रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आपण सर्वसामान्य नागरिक आहोत आणि आपण रस्त्याने वाहतूक करताना किंवा गाडीमध्ये बसताना किमान आपण जर हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरला तर आपला अपघात होणार नाही आणि अपघात जरी झाला तरी आपला जीव वाचेल या उद्देशाने वाहतुकीचे नियम आपण पाळावे तसेच महिलांनी रस्त्याने जात असताना आपली सुरक्षा करणे काळाची गरज आहे त्यामुळे ज्या ठिकाणी फुटपाथ आहे त्या फुटपाथ वरूनच आपण मार्गक्रमण करत राहावे. काळी पिवळी वाहनामधून प्रवास करत असताना ज्या ठिकाणी त्यांचा थांबा आहे त्याच ठिकाणी आपण बसून प्रवास केला पाहिजे कुठे पण गाडी थांबू नये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनाचे सर्व मूळ कागदपत्र हे आपल्या सोबत ठेवा जेणेकरून काही लाभ आपल्याला घेता येईल अपघात झाल्यानंतर काही लाभ आपल्याला घेता येईल यासाठी आपण लायसन सहित सर्व गाडीचे कागदपत्र तयार ठेवा लायसन काढण्यासाठी शासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि घरबसल्या लायसन आपल्याला येत असते लर्निंग लायसनही घरी बसूनही काढू शकतो लर्निंग लायसन प्रत्येकाने काढावे असे आवाहन सुद्धा केले. अपघात झाल्यानंतर विमा कंपनीचा क्लेम करण्यासाठी त्या धारकांना लायसन आवश्यक आहे. लायसन असेलच तर त्यांना लाभ मिळू शकतो अन्यथा मिळणार नाही. त्यामुळे लायसन सगळ्यांनी काढावे आणि गाडीचा विमा सुद्धा काढणे आवश्यक आहे काही दिवसातच रस्ता सुरक्षा विषयीची चालान भरण्याचे कार्य वाहनाची चालन वसुली करण्याचे काम होमगार्डच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे नियमानुसार आपले कार्य करणार आहेत सर्व होमगार्ड ने सुद्धा वाहतुकीचे नियम पाळावे या कार्यक्रमाला आरमोरी उपपथक कार्यालयातील प्रभारी अधिकारी, अनिल सोमनकर, फलटण नायक, सुरेश सोनटक्के, महिला अधिकारी श्रीमती बेबी मुंडरे, मोरेश्वर मेश्राम आदि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन दौलत धोटे यांनी केले प्रास्ताविक सुरेश सोनटक्के तर आभार प्रदर्शन विनोद यांनी केले या कार्यक्रमाला प्रभारी अधिकारी अनिल सोमणकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी होमगार्ड उपपथक कार्यालयातील महिला व पुरुष होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here