मौजा किटाळी/ डोंगरसावंगी परीसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

92

मौजा किटाळी/ डोंगरसावंगी परीसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

 

गडचिरोली,(Gadchiroli)दि.30 : उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग गडचिरोली यांनी संदर्भीय पत्रान्वये पोलीस स्टेशन आरमोरी अंतर्गत मोजा किटाळी/डोंगरसावंगी येथे पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र व फायरबट असून प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी यांचा गोळीबाराचा सराव तसेच दारुगोळा उडविण्याचे सराव घेण्यात येत असते. सदरहू प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी यांचा गोळीबार सराव बंद होताच मोजा किटाळी व डोंगरसावंगी येथील नागरिक हे कसलीही भिती न बाळगता फायबट समोरील डोंगराचा व जंगलाचा फायदा घेऊन गोळीबार झालेल्या ठिकाणातील शिसे व तांबे गोळा करीत असतात. तसेच यापूर्वी प्रशिक्षण केंद्र परीसरात शिसे, तांबा गोळा करण्याकरीता गेले असता,एकास हॅन्डग्रिनेड मिळाल्याने दगडावर आपटल्यामुळे त्याचा स्फोट होऊन सदर इसमाचा उजवा हात निकामी झालेला आहे.

मौजा किटाळी व डोंगरसावंगी येथील लोक हे जळावु लाकडे व गायी, म्हशी,बकऱ्या यांना चराईकरीता डोंगरावरील फायरबटच्या परीसरात घेऊन जात असल्याचे म्हणणे आहे.सदरहू प्रशिक्षण केंद्र हे अतिशय महत्वाचे व अतिसंदेनशील असल्यामुळे नक्षलवांद्याकडून कधीही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामान्य नागरीकांचा वावर त्या भागात होत असल्यामुळे अकस्मात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोजा किटाळी/

डोंगरसावंगी फायरबट प्रशिक्षण केंद्राच्या मोर्चा क्र.01 च्या उत्तरेस 100 मिटर पासून ते फायरबट समोरील

पुर्वेस असलेल्या डोंगराच्या वरील टोकापर्यंतचा संपुर्ण परिसर तसेच दक्षिणेस नविन विस्तारीत प्रशिक्षण केंद्राच्या मोर्चा क्र.04 पर्यंत सि.आर.पी.सी.च्या तरतूदीनुसार प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलेल्या

आदेशात मुदवाढ मिळण्यास विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी,मी उपविभागीय अधिकारी, देसाईगंज तहसिलदार,आरमोरी यांचेसोबत प्रत्यक्ष मौका स्थळाची पाहणी केली असता,प्रशिक्षण केंद्राचे जवळ मौजा किटाळी व डोंगरसावंगी हे गावं लागून असून त्यांचे शेत शिवार सुध्दा लागून असल्याचे दिसून येते.सदरहू गावांतील लोकांचा तसेच त्यांचेकडील जनावरे डोंगरावर जात असल्याचे खुना दिसून आल्या आहेत. मौजा किटाळी व डोंगरसावंगी येथील नागरीक गोळीबार झालेल्या ठिकाणातील शिसे व तांबे गोळा करणे, डोंगरावर जावून सरपण काढणे किंवा एखादा अपघात घडून भविष्यात जिवीत हानी किंवा इतर कोणतीही हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबींचा विचार करता,मौजा किटाळी/ डोंगरसावंगी येथील डोंगरावर असलेले पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र व सदरहू कायरबट परीसरामध्ये प्रशिक्षणार्थी यांचा गोळीबार व दारुगोळा उडविण्याचे सराव करतांनी सामान्य आमेरीकाकडून अडचण होऊ नये आणि सदरहू प्रशिक्षण केंद्राचे परीसर हे अतिशय महत्वाचे व अतीसंदेनशील असल्यामुळे शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेच्या दृष्टीने विवक्षित कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक असल्यामुळे फोजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतूदीनुसार सदरहू प्रशिक्षण केंद्राचे परीसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करणे आवश्यक वाटते.

त्याअर्थी मी. जे. पी. लोढे, उपविभागीय दंडाधिकारी देसाईगंज (वडसा),फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 वे कलम 144 अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन मौजा किटाळी/ डोंगरसावंगी फायरबट प्रशिक्षण केंद्राच्या मोर्चा क्र.01 च्या उत्तरेस 50 मिटर पासून ते फायरबट समोरील पुर्वेस असलेल्या डोंगराच्या वरील टोकापर्यंतचा संपूर्ण परिसर तसेच दक्षिणेस नविन विस्तारीत प्रशिक्षण केंद्राच्या मोर्चा क्र.04 पर्यंतच्या परीसरात खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.1)पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र व फायरबट परीसरामध्ये शासकीय कर्मचारी व अधिकारी वगळून

सामान्य नागरीक यांना प्रवेश करता येणार नाही. 2) सदरहू प्रशिक्षण केंद्रावर गोळीबाराचा तसेच दारुगोळा उडविण्याचे सराव सुरु असतांनी नागरीक व अन्य व्यक्तीस जाण्यास मनाई करण्यांत येत आहे.3)सदरहू प्रशिक्षण केंद्र व फायरबट मध्ये पोलीस दलांचे सरावाचे कालावधीत मानवी दृष्टीकोनातून सामान्य नागरीकांचे कोणतीही जिवीत हानी होऊ नये याची सतर्कता बाळगुन प्रशिक्षण केंद्र व फायरबट परीसराच्या स्वभोवती फलक लावून पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात यावे. 4)सदरहू परीसराच्या जवळ पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या जमाव करणार नाही.

5) सदरहू प्रशिक्षण केंद्र व फायरबट परीसरातील पोलीस सरावा दरम्यान प्रशिक्षणार्थी व अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही.6)प्रशिक्षण केंद्राच्या क्षेत्रापासून 50 मीटर परीसरात सामान्य नागरीक/ अन्य इसम यांना शस्त,सोटे, तलवारी,भाले,दंडे,बंदुका,सुरे,काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू ठेवता येणार नाही.7)सदरहू प्रशिक्षण केंद्राचे परीसर हे अतिशय महत्वाचे व अतिसंदेनशील असल्यामुळे स्वभोवतालच्या गावातील नागरीक,त्यांचे बैल-गाय,म्हैशी,बकऱ्या यांना चराई करण्यास,सरपण गोळा करण्यास व अनाधिकृत वाहनाच्या प्रवेशास मनाई राहील.

8) अनुचीत घटना घडू नये याकरीता सदरहू परीसराचे सभोवताल मनाईचे फलक लावावे.9)सदरहू परीसरात ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल आणि अशी चित्रे,चिन्हे,फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेस प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. (10) फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 44 (4) नुसार सदर आदेश दिनांक 19 नोव्हेंबर,2022 चे सकाळी 6.00 वाजता ते आदेश काढण्यांत आल्यापासून 60 दिवसापर्यंत मोजा किटाळी/ डोंगरसावंगी फायरबट प्रशिक्षण केंद्राच्या मोर्चा क्र.01 च्या उत्तरेस 50 मिटर पासून ते फायबट समोरील पुर्वेस असलेल्या डोंगराच्या वरील टोकापर्यंतचा संपुर्ण परिसर तसेच दक्षिणेस नविन विस्तारीत प्रशिक्षण केंद्राच्या मोर्चा क्र.04 पर्यंतच्या परीसरात लागू राहील.

11)सदर आदेशाच्या प्रती तालुका दंडाधिकारी,आरमोरी,संवर्ग विकास अधिकारी,आरमोरी,तालुका कृषि अधिकारी,आरमोरी,वन परीक्षेत्राधिकारी,पोलो,मंडळ अधिकारी,देऊळगांव,तलाठी चुरमूरा/देऊळगांव,ग्राम पंचायत किटाळी/ डोंगरसावंगी/देऊळगांव व पोलीस स्टेशन आरमोरी यांचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करावे. 12) सदर आदेश सहज दिसणाऱ्या जागी लावावे.13) सदर आदेशास मुनादीद्वारे,ध्वनीक्षेपणाद्वारे,नगारा वाजवून प्रसिध्दी देण्यात यावी. उपविभागीय दंडाधिकारी देसाईगंज (वडसा) जे.पी.लोंढे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here