मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान

105

मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान

 

गडचिरोली :- 13 जून

मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवेगाव येथील आंगणवाडी केंद्र क्र. 217 , 216 व 215 तसेच मुरखळा येथील अंगणवाडी क्र 412 इत्यादी केंद्राला भेट दिली . व या केंद्रांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान केला. यावेळी नवेगाव अंगणवाडी केंद्र क्र. 215 च्या अंगणवाडी सेविका उषा भास्करराव निखाडे व अंगणवाडी केंद्र क्र. 412 च्या अंगणवाडी सेविका मयुरी प्रभाकर सोनुले यांचा माजी नगराध्यक्ष तथा महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच अंगणवाडी केंद्रा अंतर्गत लहान मुले व स्तनदा माता यांची भेट घेऊन पोषण आहाराबाबत माहिती जाणून घेतली व ९ वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकास कामाची तसेच जनहितार्थ लोककल्याणकारी योजनांची माहिती त्यांना दिली. तसेच केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभार्थी महिलांची भेट घेऊन मिळणाऱ्या लाभाबाबत माहीती जाणून घेतली.

यावेळी भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी former president municipal council gadchiroli yogita pipare  योगीताताई पिपरे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, अर्चना चन्नावार व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here