मोदींजींच्या मुलमंत्राने आपल्या गावाचा विकास करून घ्या, MLA Dr. Devrao holi आमदार डॉ देवरावजी होळी

67

मोदींजींच्या मुलमंत्राने आपल्या गावाचा विकास करून घ्या, MLA Dr. Devrao holi आमदार डॉ देवरावजी होळी

 

ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी(गांगलवाडी) येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते नाटकाचे उद्घाटन

 

माजी आमदार अतुलभाऊ देशकर , आरमोरीचे आमदार श्री कृष्णाजी गजबे, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले, यांची प्रमुख उपस्थिती

गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सरपंच अनिलजी तिजारे यांच्या कामाचे केले कौतुक

Gangalwadi-talodhi(balapur)- chandrapur मोदींजींनी सांगितलेल्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्र्वास, व सबका प्रयास,या मुलमंत्रावर काम केल्यास आपल्या गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तळोधी (गांगलवाडी) तालुका ब्रह्मपुरी येथील नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी केले या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर , उपाध्यक्ष आरमोरीचे आमदार श्री कृष्णाजी गजबे, तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले, यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती.यावेळी रंगमंचावर तळोधीचे सरपंच अनिलजी तिजारे, माजी सभापती दोणाडकरजी, माजी सभापती वंदनाताई शेंडे , डॉ. बालपांडेजी, भाजपा पदाधिकारी कंत्राटदार ज्ञानेश्वरजी दिवटे, उपसरपंच मारबतेजी, तळोधीच्या माजी उपसरपंच सौ. उषाताई भिवणकर, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य यांचेसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी त्यांनी गावाच्या विकासासाठी धडपड करणारे तळोधीचे सरपंच अनिलजी तिजारे यांच्या कामाचे कौतुक केले.भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करूनमागील अनेक वर्षानंतर तळोधी येथे सरपंच पद मिळवल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मोदीजींच्या मूलमंत्र्यावर चालणारा असून त्यांच्या मूलमंत्रावरच गावाचा विकास अवलंबून आहे त्यामुळे मोदीजींच्या मूलमंत्राचा आधार घेत काम केल्यास गावाचा नक्कीच विकास होईल असे प्रतिपादन त्यांनी या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here