मार्कंडादेव मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे जिर्णोद्धारच्या कामाला लवकरच सुरवात होणार

180

मार्कंडादेव मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे जिर्णोद्धारच्या कामाला लवकरच सुरवात होणार

खासदार अशोक जी नेते यांनी घेतली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुन मलीक यांची रविभवन नागपुर ला भेट

मार्कंडादेव/गडचिरोली:- विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे जिर्णोद्धाराचे बांधकाम गेल्या अनेक दिवसापासून बंद स्थीतीत आहे ते बाधकाम तत्काळ सुरु करावे या संबधाने गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज नागपुर येथे जाऊन रविभवनात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुन मलीक यांच्याशी भेट घेऊन दिशा निर्देश दिले आहे सोबत मंदिरात येणाऱ्या भाविक भक्त,पर्यटक याच्या करीता सोयीसुविधा सुद्धा ऊपलब्ध करुन द्यावे अशी मागणी सुद्धा खासदार अशोक नेते यांनी केली असुन अगदी काही दिवसातच मार्कंडादेव मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे बांधकाम सुरु करणार अशी ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुन मलीक यांनी खासदार अशोक नेते यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here