Newly Appointed Sarpanch Mrs. Sangeeta Raju Mogre will do her best for the development of Markandadev village.

230

Newly Appointed Sarpanch Mrs. Sangeeta Raju Mogre will do her best for the development of Markanda-deo village.

मार्कंडादेव गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार नवनियुक्त सरपंच सौ.संगीता राजु मोगरे

मार्कडादेव: चामोर्शी -गडचिरोली  markanda-deo-chamorshi- Gadchiroli- स्थानिक ग्रामपंचायत च्या  संरपच पदाची सुत्रे सौ.संगीता राजु मोगरे यांनी आज शुक्रवारी हाती घेतले यावेळी  त्यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत चे सचिव श्रीकृष्ण मंगर यांनी स्वागत केले या प्रसंगी  नायब तहसीलदार ए.बी .लोखंडे मँडम उपस्थित होत्या ,संरपंच पदाची सुत्रे हाती घेतल्यावर आपले मत व्यक्त करताना  नवनियुक्त सरपंच सौ.संगीता राजु मोगरे म्हणाल्या कि गावाच्या विकासासाठी आपन सर्वतोपरी प्रयत्न करनार असुन आता निवडणूका संपल्या, कुणाला विजश्री प्राप्त झाली तर कुणाचा पराभव झालां ,हा फक्त निवडणूक चा एक भाग समजुन, सर्व मतभेद विसरून सर्वानी विकासासाठी आमच्या सोबत यावे,प्रत्येक गावातील नागरिकांच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचे आहे, निवडणूक ही अशी एक लोकशाही पद्धत आहे की ज्यांमध्ये जनता ठरविते  कि कोण त्यांचे प्रश्न ,समस्या सोडविण्यासाठी कार्य करु शकतो अश्याच उमेदवाराला विजश्री मिळवून देतात,त्यामुळे आपल्याला लोकशाही जिवंत ठेवत गावाच्या विकासाकरीता कामे करायची आहेत, गावाच्या विकासासाठी आपल्याला जनतेनी निवडून दिले आहे,त्यामुळे वैरत्व निर्माण न करता योग्य कार्य करुन विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन कामे व्हावीत अशा आशावाद संरपच सौ. संगीता राजु मोगरे यांनी व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here