माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी जाणल्या इंदिरा नगरातील महिलांच्या समस्या

115

माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी जाणल्या इंदिरा नगरातील महिलांच्या समस्या

 

गडचिरोली:- 14/10

गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी आज दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्डात जाऊन आंबेडकर चौकातील महिलांची भेट घेतली व वार्डातील समस्या, घरकुल, शौचालय, उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती जाणून घेतली व इतरांना लवकरच या योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले.

तसेच वार्डातील जय माँ दुर्गा भुलाई मंडळ येथे त्यांनी भेट दिली व महिलांशी चर्चा करून त्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेऊन त्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी भुलाई मातेचे ( शिव पार्वतीचे ) पूजन करून दर्शन घेतले.

 

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भुलाई मंडळाच्या अध्यक्ष अरुणाताई नेवारे, सदस्य वेणूताई चिंतलवार, सुवर्णा कंचलावार, मंगला भैसारे, ज्योती व्याहाडकर, शकुंतला मोटघरे, वैशाली गेडाम, मंदा गेडाम, नंदा मोटघरे, जिजाबाई कोतकोंडावार, वंदना कागदेलवार, इत्यादी महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here