महिलांनी आधुनिक मॉडर्न मेकअप कला शिकून स्वयंरोजगार करावा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

88

महिलांनी आधुनिक मॉडर्न मेकअप कला शिकून स्वयंरोजगार करावा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

मॉडेल मेकअप च्या सुंदर प्रात्यक्षिकाने शहरातील महिलाही भारवल्या

 

गडचिरोली येथे लूक अँड लर्न ग्रॅण्ड मेकअप कार्यक्रम

 

गडचिरोली(Gadchiroli) :- दि.17/10 :-आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व धावपळीच्या युगात महिलांना सर्व कामे सांभाळत कुटुंब चालवीत असतांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही प्रत्येकच महिलांना वाटते की आपण सुंदर दिसावे, थोडा मेकअप करावा मात्र घरची कामे, मुलांची तयारी, त्यांचा अभ्यास इत्यादी व्यस्त कामांमुळे थकल्यासारखे झाल्यावर त्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत.नेहमीच्या कामातून थोडा वेळ काढून आठवड्यातुन एक दिवस तरी आधुनिक पद्धतीचे मेकअप, हेअरस्टाईल करून सुंदर दिसण्याचा महिलांनी प्रयत्न करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. लूक अँड लर्न ग्रँड मेकअप कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, आधुनिक पद्धतीचा मॉडर्न मेकअप चे प्रशिक्षण घेऊन ब्युटी पार्लर चा व्यवसाय करून घरच्या- घरी महिला आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात त्यामुळे महिलांनी दिवसातून एक ते दोन तास स्वतःसाठी वेळ काढून मेकअप करण्याचे कौशल्य आत्मसात करून आपला आर्थिक विकास साधला असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.

गडचिरोली शहरात पहिल्यांदाच मेकअप आर्टिस्ट, मेकअप व हेअर स्टाईल डिझायनर व ब्युटी पार्लर च्या संचालिका तसेच मेकअप करण्यास उत्साही महिलांसाठी गडचिरोली येथील काजल बोगोजवार व आचल कोट्टावार, यांनी सुंदर अशा लूक अँड लर्ण ग्रॅण्ड मेकअप कार्यक्रम आयोजन काल दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी बचत भवन येथे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत करण्यात आले होते.*कार्यक्रमाला विशेष आमंत्रित अतिथी तथा मेकअप तज्ज्ञ म्हणून प्रगती मेकअप मंत्रा, नागपूरच्या प्रमुख संचालिका मिस प्रगती म्याडम प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर ग्रँड मेकअप कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

 

प्रमुख पाहुणे म्हणून गीताताई बोगोजवार, सुरेखाताई कोट्टावार, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, ज्यासमिना मेश्राम, नैना सिडाम, ज्योती उंदिरवाडे, ज्योती कोट्टावार, काजल बोगोजवार, आचल कोट्टावार उपस्थित होत्या.

 

या लूक अँड लर्न ग्रँड मेकअप कार्यक्रमात महिलांना व मुलींना मेकअप करतांना कोणकोणत्या वस्तूंचा वापर करायचा , मॉडेलचे मेकअप कसे करायचे, हेअर डिझायनिंग कशी करायची याची इत्यंभूत माहिती देऊन त्यांना मॉडेल्स मेकअप चे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. गडचिरोली येथे पहिल्यांदाच अशा सुंदर मेकअप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील ब्युटी पार्लर च्या सर्व संचालिका, मेकअप आर्टिस्ट, हेअर डिझायनर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या त्यांना सुंदर मेकअप करण्याचे चांगले तंत्र नागपूर च्या मिस प्रगती म्याडम यांनी समजावून व स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवून सांगितले. या उत्कृष्ठ अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली झाल्याचे पाहून महिला मंत्रमुग्ध झाल्या व त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here