महाराष्ट्र राज्यातुन गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातुन सर्वाधिक मताधिक्याने खासदार प्रतिनीधी निवडुन येईल जिलाध्यक्ष प्रशांत वाघरे

191

महाराष्ट्र राज्यातुन गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातुन सर्वाधिक मताधिक्याने खासदार प्रतिनीधी निवडुन येईल जिलाध्यक्ष प्रशांत वाघरे

महायुतीची पत्रकार परिषद गडचिरोली येथे संपन्न.

दि.१२ जानेवारी २०२४

गडचिरोली:-१४ जानेवारी ला होणाऱ्या महायुतीचा महामेळावा या करीता महायुतीची पत्रकार परिषद सर्किट हाऊस , कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वातील अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

संकल्प महाविजय – २०२४ महा युतीच्या प्रदेश नेतृत्वाच्या सुचनेनुसार व प्रदेश स्तरावरील ठरल्याप्रमाणे गडचिरोली येथे १४ जानेवारी ला होणाऱ्या जिल्हा स्तरावरीय महामेळाव्या करीता महायुतीची पत्रकार परिषद आज नुकतीच खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.हा महायुतीचा महा मेळावा महाराजा लॉन धानोरा रोड, गडचिरोली येथे घेण्याचे ठरले.

 

यावेळी प्रामुख्याने पत्रकार परिषदेला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,आमदार डॉ.देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत जंम्बेवार, आर.पी.आय.गटाचे मुनिश्वर बोरकर,आर.पी.आय (आठवले) गटाचे घुटके जी,किसान आघाडी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस रमेशजी भुरसे,भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,भाजपा महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,राष्ट्रवादी काँग्रेस युवा कमेटीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, अमीदाताई मडावी,निताताई वडेट्टीवार, भानारकर जी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here