मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे आ. डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन

67

मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे आ. डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन

आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष २०२३ ,सरकारच्या विकासाच्या ८ वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर आधारित हे प्रदर्शन

मार्कंडाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी प्रदर्शनी अवश्य बघावी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे आवाहन

 

दिनांक १७ ते २१ फरवरी २०२३ पर्यंत प्रदर्शनीचे आयोजन*

 

दिनांक १७/२/२०२३ मार्कंडा

मार्कंडादेव (चामोर्शी) जि.गडचिरोली (महाराष्ट्र) सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय वर्धा आणि जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या सह्योगाने आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष २०२३ ,सरकारच्या विकासाच्या ८ वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.*

 

*यावेळी भारतीय सूचना प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय अधिकारी हंसराजजी राऊत ,गडचिरोली पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सरपंच मार्कंडा, यांचे सह केंद्रीय संचार ब्युरोचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

भारत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून ही प्रदर्शनी दिनांक १७ ते २१ फरवरी २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. हे प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परिसर मार्कंडा देव येथे असून सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनीचे आयोजन अत्यंत उत्तम असून मार्कंडा देवस्थान यात्रेला येणाऱ्या भक्तांनी या प्रदर्शनीला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here