
भेंडाळा व परिसरातील २६ गावांसाठी पिण्याच्या योजना लवकरच मंजुर होणार आमदार डॉ देवरावजी होळी

योजना मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतली भेट.
पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले प्रधान सचिवांना योजनेत समाविष्ट करण्याचे आदेश
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चीचडोह बॅरेजवर भेंडाळा सह १८ ग्रामपंचायतीच्या २६ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती आमदार डॉ देवराव जी होळी यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतल्यानंतर दिली.
भेंडाळासह १८ ग्रामपंचायतीच्या २६ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याची (फिल्टर) पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा याबाबतची मागणी करणारे पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिले.
ग्रामपंचायत भेंडाळा, फोकुर्डी, नवेगाव , मुरखळा माल, सगणापूर , कानोली, वेलतूर (तुकुम), वाघोली ,घारगाव, रामाळा ,मार्कंडादेव , फराडा, मोहूर्ली,चाकलपेठ, कळमगाव ,लखमापूर बोरी, मुरखळा चेक (बल्लू )या १८ ग ग्राम पंचायतींच्या २६ गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होते. या भागात लहान लहान पाण्याच्या योजना आहेत परंतु भविष्यकालीन विचार करता त्या पुरेशा नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या १८ ग्रामपंचायतींच्या २६ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना बनवण्याची आवश्यकता आहे. करिता सदर योजना मंजूर करून या योजनेस निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पाणीपुरवठा मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली त्यावर त्यांनी लगेच सदर योजना समाविष्ट करण्याबाबत प्रधान सचिवांना निर्देशित केले.
त्यामुळे या गावातील उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपणार असून लवकरच या ठिकाणी योजना मंजूर होऊन त्यास निधी उपलब्ध होईल अशी माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून दिली आहे.