भाजप महिला मोर्चाच्या आदिवासी आघाडी शहर अध्यक्षपदी भावना कुलसंगे   Bhavana kulsange यांची निवड

107

भाजप महिला मोर्चाच्या आदिवासी आघाडी शहर अध्यक्षपदी भावना कुलसंगे   Bhavana kulsange यांची निवड

 

गडचिरोली:- दि. 25/11 :-  Ramnagar -Gadchiroli भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आदिवासी आघाडी च्या शहर अध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्त्या भावना कुलसंगे (हजारे) यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर नियुक्ती भाजपचे महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर यांच्या मार्गदर्शनात महिला मोर्चा च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे यांनी केली.त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी आमदार कृष्णाजी गजबे भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे , शहर अध्यक्ष कविता उरकुडे व भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेसाठी व गरीब महिलांपर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवून मला महिला आघाडी आदिवासी मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी महिलांच्या समस्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवून शासनाच्या योजनाही महिलांपर्यन्त पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असून गरीब आदिवासी महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी प्रामुख्याने गडचीरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर जी काटवे, महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, तालुक्याचे महामंत्री हेमंत बोरकुटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हर्षल गेडाम भाजपचे ज्येष्ठ नेते आबाजी चिचघरे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, महिला मोर्चा च्या शहर महामंत्री रश्मी बाणमारे , युवा मोर्चाचे राजू शेरकी, गडचिरोली शहर दलित आघाडीचे शहर अध्यक्ष प्रा. उराडे सर विलास नैताम देवाजी लाटकर पूनम हेमके उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here