बार्टीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

94

बार्टीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

कुरखेडा, तालुका प्रतिनिधी दि-08 मार्च

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी) पुणे समतादुत प्रकल्प अंतर्गत प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या मार्गदर्शनात मौजा खेडेगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करन्यात आले. समतादूत होमराज कवडो यांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता, राणी लक्ष्मी बाई, मदर तेरेसा, यांच्या जीवणावर प्रकाश टाकून समाजाची प्रगती हि स्त्रियांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही असे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे उपस्थित महिलांना शिक्षणाशिवाय माणसाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही म्हणून आपल्या मुलांना शिक्षण द्या त्यांना योग्य संस्कार द्या असं मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. यमूलता पेंदाम सरपंच, प्रमुख पाहुणे सौ. पुष्पा खरवडे अंगणवाडी सेविका , श्री. होमराज कवडो समतादूत, सौ विद्या वट्टी , , सौ रंजूताई कराडे, प्रणाली मेश्राम ,वर्षा मेश्राम, सौ पुष्पा रोकडे शाळेतील मुली व शेषराव मेश्राम ग्रामपंचायत सिपाई यांनी सहकार्य केले व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here