बजेटमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते- पुल विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या MLA dr.devrao holiआमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री PWD minister ravindra chchan maharashtra. रविंद्रजी चव्हाण यांना संयुक्त निवेदन

68

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अति दुर्गम भागातील रस्ते व पूलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची केली विनंती

Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अति दुर्गम भागात रस्त्यांची पुलांची अत्यंत आवश्यकता असून येणाऱ्या बजेटमध्ये त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री रवींद्रजी चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली यावेळी भाजपाचे जिल्ह्याचे नेते अरुणभाऊ हरडे, प्रामुख्याने उपस्थित होते*गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी निधी मेळावा याकरता मागील काही दिवसात आमदार डॉक्टर देवरावजी होळी हे सातत्याने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या भेटीला जात असून जिल्ह्यातील अजूनपर्यंत न झालेल्या रस्त्यांसाठी व लहान नद्या ,लहान नाल्यांवरील पुलांसाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आमदार कृष्णाजी गजबे व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्यातील या रस्ते पूलांच्या समस्यांबाबत संयुक्तपणे निवेदन देऊन मंत्री महोदयांना जिल्ह्यातील या रस्ते व पूलांसाठी अधिकाधिक निधी येणाऱ्या बजेटमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here