प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी महा . प्रदेश आदीवासी विभाग्याच्या अध्यक्षपदी डॉ नामदेवराव उसेंडी यांची निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

108

प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी महा . प्रदेश आदीवासी विभाग्याच्या अध्यक्षपदी डॉ नामदेवराव उसेंडी यांची निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

 

गडचिरोली(Gachiroli)अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघेजी यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ व अनुभवी नेते माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांची नियुक्ती केली. त्यानिमित्ताने माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानभाऊ पटोले यांच्या सुकळी येथील निवस्थानी जाऊन दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला गेले असता त्यावेळी त्यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली असल्याने नवनियुक्त आदिवासी विभागाचे अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून अभिनंदन केले. व म्हणले की काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव जोपासणारा आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासीना मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये जोडण्याच काम करावे. तसेच सर्व जाती धर्माना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here