पात्र असूनही अनेक घरकुल लाभार्थ्यांना अपात्र केले अशा   वंचित लाभार्थ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन आणुन द्यावे

82

घरकुल मंजुरीच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास निवेदन आणून द्या,घरकुलापासून वंचीत राहिलेल्यांना आमदार डॉ देवरावजी होळी यांचे आवाहन

पात्र असूनही अनेक घरकुल लाभार्थ्यांना अपात्र केले अशा   वंचित लाभार्थ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन आणुन द्यावे

चामोर्शी व गडचिरोली येथील आपल्या सोयीच्या दृष्टीने योग्य ठरणाऱ्या जनसंपर्क कार्यालयात आपले निवेदन द्यावे.

गडचिरोली(Gadchiroli-Chamorshi) विधानसभा क्षेत्रातील ज्या व्यक्तीला घरकुलाची नितांत आवश्यकता आहे, ज्यांचे घर पडलेले आहे,जे लहानच्या झोपडी मध्ये राहत आहे, ज्यांचे घर मोळकडीस आलेला आहे , ज्यांचे घर कवलारू मातीचे आहे, ज्यांचे घर पक्के नाही ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केला तो ग्रामपंचायतीने मंजूरही केला मात्र मात्र पंचायत समितीच्या “प्रपत्र ड” च्या पडताळणी दरम्यान अपात्र करून यादी मधून वगळण्यात आला. अशा अन्यायग्रस्त घरकुल अर्जदारांनी आपल्या घरकुला संबंधित असणाऱ्या तक्रारीचे निवेदन आपल्या सोयीने पडणाऱ्या चामोर्शी किंवा गडचिरोली येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आणून द्यावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here