पांदण रस्त्याचे खडीकरण व कलवट बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या मुरखळा चक येथील नागरिकांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

144

पांदण रस्त्याचे खडीकरण व कलवट बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या मुरखळा चक येथील नागरिकांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

Murkhala chal(chamorshi-gadchiroli) 4 nov:-  मुरखळा चक येथील तलावा मागील रस्त्यापासून वाकडी नाल्यापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याचे खडीकरण व कलवट तयार करणे आवश्यक असून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुरखळा चक येथील रहिवाशांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केले.यावेळी  तालुका अध्यक्ष दिलीप जी चलाख महामंत्री साईनाथ जी बुरांडे, आनंद दुबे नंदाजी उडान दीपक तामसकर बंडुजी वाळके बाबुराव वैरागडे मुकुंदराव दुधे रामचंद्र कुनघाडकर, भाऊजी कुनघाडकर यशवंतराव उडान शालीकराव यांचे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागणीचा विचार करून सदर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदकांना दिले. मुरखळा चक येथील रहिवाशांची वाकडी नाल्यापर्यंत शेती असून त्याकडे जाणारा पांदण रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण व त्या ठिकाणी कलवटचे बांधकाम करणे आवश्यक आहे . करिता आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मुरखडा चौक वाशी यांनी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे कडे निवेदनाच्या माध्यमातून केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here