पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

64

पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या गडचिरोली व चामोर्शी येथील कार्यालयामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी केले पंडितजींना अभिवादन

 

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमांत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग

गडचिरोली(gadchiroli) :-एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाडी अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे ,नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, शहराचे महामंत्री विनोदभाऊ देवोजवार, युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षलजी गेडाम , भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे नेते देवानंद भाऊ चलाख, प्रशांतभाऊ अलमपटलावार , नामदेव तुमाने, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “मन की बात” या कार्यक्रमात सहभाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here