नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निवेदकांना आश्वासन

55

जुलै ते ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त धानपिकांची नुकसान भरपाई द्यावी

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांना शेतकऱ्यांचे निवेदन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निवेदकांना आश्वासन

Chamorahi-Gadchiroli 4 nov:- गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टी व महापुराच्या परिस्थितीमुळे असंख्य शेतकऱ्यांचे धानाचे पीक उध्वस्त झाले. परंतु त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या काहीं निकषांमुळे पूरबुळीच्या मदतीपासून वंचित राहावे लागले त्यामुळे या मदतीपासून वंचित राहिलेल्या व जुलै ते ऑगस्ट या महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदजी भांडेकर, तालुक्याचे अध्यक्ष दिलीपभाऊ चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे, नारायणजी भाकरे घनश्यामजी भाकरे लुमाजी मशाखेत्री ,काशिनाथजी राऊत ,कविता म्हशाखेत्री ,ललिता पोटे ,अजय कोनोजवार ,मंदाबाई कोनोजवार ,वनिता व्‍याहाडकर ,लालाजी राऊत, हरी भाकरे, सखाराम भाकरे, सुरेखा, जानकीराम राऊत, उमाकांत म्हशाखेत्री, कृष्णा बावणे, रामदास कासेवार, पांडुरंग राऊत, लुमाजी राऊत, यांचे सह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या निवेदनावर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आपण शासन स्तरावर तातडीनं प्रयत्न करू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here