नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला-जिल्हाधिकारी, संजय मीणा

78

नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला-जिल्हाधिकारी, संजय मीणा

Citizens chose development by adopting democratic values-District Magistrate, Sanjay Meena

– प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना दिल्या शुभेच्छा

 

– पद्मश्री पुरस्कार विजेते जेष्ठ नाट्य कलाकार परशुराम खुणे यांचा प्रशासनाकडून सन्मान

 

 

गडचिरोली,(जिमाका)दि.26: आत्तापर्यंत जिल्हयात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. परंतू आता परिस्थिती बदलत आहे, नक्षली विचारधारांना आता जिल्हयातून हद्दपार केले जात आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. सर्वांना आता विकास हवाय. प्रशासन, पोलीस दल यांना विविध योजनांच्या सहाय्याने लोकशाही मुल्य रूजविण्यास यश मिळाले आहे. नक्षल विचारधारा नेहमीच विकासापासून दूर असते. आता प्रत्येकालाच विकास हवाय, कौटुंबिक अर्थचक्राला गती देणारी व्यवस्था हवीय. यासाठी प्रशासन सर्व सामान्य नागरिकांच्या सोबत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. ते ७३ व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हावासियांना उद्देशून बोलत होते. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावरती प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याहस्ते ध्वजारोहन करून संपन्न झाला. यावेळी आमदार डॉ.देवाराव होळी, पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, सहा.जिल्हाधिकारी राहूल मीणा, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

 

 

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, आता नागरिक विविध शासकीय योजना स्विकारून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. रोजगार निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन वनोपज, नरेगा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आधुनिक शेती, शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते आणि आरोग्य सुविधांमधून पाठबळ देत आहे. जिल्हयात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत असून शासनाकडून खनिज प्रक्रिया उद्योग येत्या काळात सुरू केले जाणार आहेत. कौशल्य वृद्धीसाठी एकल केंद्र, अल्फा ॲकादमी, टाटाचे केंद्र उभारून रोजगार निर्मितीसाठी युवकांच्या क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हयातच रोजगाराबाबत प्रशिक्षण व रोजगारासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करणे हा प्रशासनाचा मुख्य हेतू आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

यानंतर जिल्हाधिकारी यांनी परेड निरीक्षण केले. विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते करण्यात आला. यात नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गडचिरोली जिल्हयातील रहिवासी जेष्ठ नाट्य कलावंत परशुराम खुणे यांचा गौरव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. पोलीस विभागामधील पो.नि. विठ्ठल मनोहर मुत्यमवार यांचे पोलीस दलात 36 वर्षे 7 महिने उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल गौरव करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पदक मिळाल्याबद्दल सुहास ईलमलवार, ओमकांत पवार, धनराज पोरेड्डीवार, अमित सिंग, संदिप बुरांडे, श्रीमती रुपाली काळे, शाख अभियंता यांना पोलीस मुख्यालय व इतर पोलीस विभागाची कामे केल्याबद्दल प्रशंसनीय पत्र देऊन सत्कार केला, आरोग्य विभागातील उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या रुग्णालयांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, सिंधु आर्थोपेडिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर, गडचिरोली, कृषि विभागात उल्लेखनिय कामगिरी करीता संदिप कऱ्हाळे, शितल खोब्रागडे, सतीश कावरे, सुयशा वसवाडे यांचा सन्मान केला. क्रिडा विभागात सेवा निवृत्त क्रीडा अधिकारी मदन पी. टापरे यांचा सन्मान २९ वर्ष सेवा करून विविध कार्यक्रमात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल केला, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिंक क्रीडा स्पर्धा 2022-23 करीता रोशन नारायणराव साळंके यांना धनुर्विद्या या खेळात सुवर्ण पदक, मनस्वी राजु बामनकर यांना धनुर्विद्या या खेळात कांस्य पदक, यशश्री चंद्रकांत साखरे यांना बॉक्सिंग या खेळात रौप्य पदक, सेजल किशोर गद्देवार यांना वुशु या खेळात सुवर्ण पदक, गौरव हिचामी वुशु या खेळात रौप्य पदक, मोनिका शामराव सडमेक- 32 व्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधीत्व केल्यामूळे सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात भगवंतराव हिंदी हायस्कुल, गडचिरोली, वसंत विद्यालय, गडचिरोली, प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, गडचिरोली, शिवकृपा महाविद्यालय, गडचिरोली, कार्मेल हायस्कुल, गडचिरोली यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here