नगर परिषदेची निवडणूक जिंकण्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामास लागावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी

89

नगर परिषदेची निवडणूक जिंकण्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामास लागावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी

 

भाजपा गडचिरोली शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न

केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे केले प्रतिपादन

Gadchiroli लवकरच गडचिरोली नगरपरिषदेची निवडणूक लागणार असून ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीत जिंकावयाची असल्याने भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा इराद्याने कामाला लागावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली भाजपा शहर कार्यकारणीच्या बैठकीच्या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते, जिल्ह्याचे महामंत्री प्रमोदजी पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर जी काटवे,माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रंजिताताई कोडाप, गडचिरोली शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ कविताताई उरकुडे , जेष्ठ नेते गोवर्धनजी चव्हाण प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.बैठकीला गडचिरोली शहरातील बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांचे सह शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी राज्य व केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असून त्यातूनच जनतेला आपल्या सरकारने केलेल्या कामांची माहिती होईल व त्याचा आपल्याला लाभ होईल. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here