देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासहित विविध ११ विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासहित विविध ११ विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

 

नागपुर :- देशाच्या सर्वांगीण विकासात तेथील पायाभूत सुविधा प्रकल्प हे विशेष भूमिका बजावतात. #नागपूर ते #मुंबई समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल असे विश्वासपूर्ण गौरवोद्गार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काढले. राज्यात डबल इंजिन सरकार कार्यरत झाल्यानंतर किती गतिमानतेने काम करत आहे, याचेच हे उदाहरण असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचे नाव या महामार्गाला दिले याचा मला विशेष आनंद होतो, असे मत त्यांनी यासमयी व्यक्त केले.समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. आज हा #समृद्धी_महामार्ग लोकांच्या सेवेत आणताना हा महामार्ग राज्यातील #गोंदिया, #भंडारा, #गडचिरोली आणि #नांदेड या जिल्ह्यांनाही जोडण्यात येणार असल्याचे याप्रसंगी बोलताना अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कायमच आम्हाला चांगले काम करायला प्रेरणा दिली असून तुमचा आशीर्वाद पाठीशी असेल तर यापुढे देखील उत्तम काम करू अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली.याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

#MahaSamruddhi #Hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Maharashtra

#SamruddhiMahamarg

Narendra Modi Bhagat Singh Koshyari Devendra Fadnavis Dr.Bharati Pravin Pawar डॉ.भारती प्रवीण पवार Raosaheb Patil Danve Chandrashekhar Bawankule