दलित समाजातील रेड्डी बुचम मृत्यूप्रकरणाची चौकशी करून दोषींनवर कडक कारवाही करा ; अनुसूचित जाती काँग्रेसच्या वतीने मागणी

65

दलित समाजातील रेड्डी बुचम मृत्यूप्रकरणाची चौकशी करून दोषींनवर कडक कारवाही करा ; अनुसूचित जाती काँग्रेसच्या वतीने मागणी

 

गडचिरोली :: सिरोंचा तालुक्यातील दलित समाजातील युवक रेड्डी बुच्चम जाडी, २४ जून २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास आदिमुक्तापूर येथील जंगलालगत काही कामानिमित्त गेले होते.  तिथे वन कर्मचार्यांनी त्याला पकडले व अमानुष मारहाण केली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सदर प्रकरणाची नोंद घेऊन तातडीने दोषीं वनअधिकाऱ्यांना निलंबित करून त्यावर  गुन्हे नोंदवून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावे. अशी मागणी अनुसुचीत जाती विभाग काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली यांच्या कडे केली आहे. अन्यथा अनुसूचित जाती विभाग कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला.

यावेळी निवेदन देतांना अनुसूचित जाती विभाग काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा काँग्रेस कोषध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, सेवा निवृत्त संवर्ग विकास अधिकारी काशिनाथ भडके, अनुप कोहळे, गौरव कोल्हट वार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here