
तो समुद्र किनारा

सखे, तूझ्या माझ्या प्रेमाचा
साक्ष समुद्र किनारा
वाळूवरचा पाऊलखुणा
प्रेमाची अनुभूती देणारा
अथांग असा सागरावर
फेसाळनाऱ्या लाटांचा खेळ
सळसळणारा शांत वारा
बसावं तसा जीवनाचा मेळ
खडतर जरी आयुष्य
येतील अनेक वादळ वारे
समस्याच्या नावेवर स्वार होऊन
पार करू अडथळे सारे
किती सुंदर होता गं
तो समुद्र किनारा
मोठया मोठया लाटा
न थंड गार वारा
भासच होता तो
तू अन तुझा हसरा चेहरा
मी शोधत होते गं
तूझ्या सोबतच निवारा
माझ्या मनात होता
साऱ्या प्रश्नाचा ढिगारा
पण उत्तर देत होता
तो समुद्र किनारा
– अजय राऊत