तेली समाजाला संघटनात्मक बांधणीची गरज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

69

तेली समाजाला संघटनात्मक बांधणीची गरज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

 

गडचिरोली:- दि. 11/12 आपला समाज हा एकजुटीने काम करीत नसल्याने समाजाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. आपल्या देशात झालेल्या संत महान पुरुषांनी जनतेला व मागास प्रवर्गातील नागरिकांना एकसंघ राहुन आपला व समाजाच्या उत्थानासाठी सतत परिश्रम घेऊन कार्य करण्याचा संदेश दिला होता. मात्र महापुरुषांच्या विचार व कार्यांकडे आजचे नागरिक व तरुण युवा वर्ग दुर्लक्ष करत असून संतांचे विचार विसरत चालला आहे त्यामुळे आपला समाज अजूनही मागासलेला आहे. या समाजाला चांगले विचार व कार्याची गरज असून तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीतून व संतांचे चांगले विचार आत्मसात करून आपला व समाजाचा विकास साधावा व समाजाचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले. नुकत्याच संताजी स्मुर्ती प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद कामडी होते तर प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे तसेच ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, प्राध्यापक शेषराव येलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, एडवोकेट रामदास कुणघाडकर विदर्भ प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भांडेकर प्रा. विलासजी निंबोरकर, राजेश ईटणकर, चांदेवार व गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील तेली सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विलास निंभोरकर यांनी आभार प्रदर्शन सुरेशजी भांडेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here