
तिर्थक्षेत्र मार्कडादेव ग्रामपंचायत येथे संविधान दिवस साजरा

मार्कडादेव(ग्रामपंचायत)-चामोर्शी-गडचिरोली-markanda-deo(grampanchayat) chamorshi-gadchiroli : दि 26/11:- येथील ग्रामपंचायतसभागृहात संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रथमतः परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग गृप ऑफ मार्कडादेव टेम्पल चे इन्चार्ज श्री छबिलदास नारायण सुरपाम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहीण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक मंगर यांनी संविधान ऊद्देशपत्रीकेचे वाचन केले,यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक मंगल,यु.एन.जुनघरे अमीत जुनघरे ,मोबीलंचंद मरस्कोल्हे, आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलें