
तंत्रज्ञानाच्या धारेवर निपजलेली तरुण पिढी म्हणजे देशाचा खरा नावलौकिक – श्री चेतन वंजारी.

नागपुर :-भारतातील विद्यार्थी वर्गाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या इलेक्ट्रॉनिक व्यापाराचे प्रशिक्षण देऊन डिजिटल स्वरूपातील रोजगार संधी समजावून सांगणे ही आजच्या काळातील अपरिहार्य बाब बनली असून इलेकट्रॉनिक पद्धतीचा वापर करून करियर आणि रोजगाराच्या उत्तम संधी त्यांना प्लेसमेंट आणि इंटरणशिप च्या माध्यमातून रॉयल वेबटेक कंपनी उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन संचालक श्री चेतन वंजारी यांनी अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या माध्यमातून आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत केले. उद्योग क्षेत्रातील डिजिटल मार्केटिंग ची वाढती मागणी आणि व्यवसाय संधी यावर महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर गजानन पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रातील विविध संधी आणि असीमित रोजगार संधी यावर रॉयल वेब टेक चे मानव संसाधन व्यवस्थापक प्रज्योत रेवतकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. महिला उद्योजका म्हणून महिलांना डिजिटल मार्केटिंग आणि ग्राफिक डिझायनर क्षेत्रातल्या खुणावणाऱ्या संधी बद्दलचे विस्तृत मार्गदर्शन सौ. रुचिका चेतन वंजारी यांनी केले. सीनियर वरिष्ठ मानव संसाधन व्यवस्थापक श्री शुभम घवघवे यांनी प्लेसमेंट आणि इंटरशिपच्या विविध मुद्द्यांवर आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर ठेवून या क्षेत्रातील आवश्यक तयारी करण्याचे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे आयोजक आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख डॉ.मनोज मडावी यांनी सांख्यिकीय आकडे देऊन ग्राफिक डिझाईनिंग आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील वाढती रोजगार निर्मिती आणि आवश्यक कौशल्य संपादनाची भूमिका प्रस्तावनेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादासोबत रॉयल वेबटेच्या संयुक्त आयोजनामधून ही कार्यशाळा यशस्वी पार पडली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी मुस्फेरा बेग, आभार प्रदर्शन दानिया खान हिने केले. अहमद अन्सारी, नाझिया खान,कशिश जांभुळकर,ऐतश्याम अन्सारी आणि कमिटीच्या सदस्या डॉ. नीता शर्मा, डॉ. कांचन ठाकरे, डॉ. मंजुषा ठाकरे यांनी कार्यशाळेसाठी आपले सहकार्य आणि बहुमोल सहभाग नोंदविला.