ट्रकच्या धडकेत मार्कंडा देव येथील तिघांचा मृतु तर एक जख्मी

685

मार्कंडादेव markanda deo ta.chamorshi dist gadchiroli वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने तहसील कार्यालयासमोरील वळणावर दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांची प्राणज्योत मावळली झाल्याने मार्कंडा देव गाव शोकग्रस्त  आहे.प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. तर नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी असल्याचे माहीती असुन त्यांना जिला सामान्य रुग्णालय गडचिरोलीला केले गेले आहे.मार्कंडादेव (markanda deo Ta.chamorshi) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी ०८एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्या नंतर १० ते १५ फूट फरफटत गेली. यात रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here