जिल्ह्यात हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिमेची सुरुवात

67

जिल्ह्यात हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिमेची सुरुवात

 

गडचिरोली,(Gadchiroli)दि.01: गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व हिवताप संवेदनशिल आहे. या जिल्ह्यात १२ तालूके असून संबंधीत तालुक्यामधील एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची, अहेरी, हे तालुके अतिशय दुर्गम कार्यक्षेत्र असून नदी, नाले, डोंगर दऱ्यांनी व पहाडांनी आच्छादलेले आहे. गडचिरोली जिल्हा लगत छत्तीसगढ, तेलंगाना हे राज्य व महाराष्ट्रातील भंडारा, गोंदीया व चंद्रपूर या जिल्हयाची सिमा लागून आहे. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिक हे जंगलात असलेल्या छोट्या-छोट्या गावामध्ये राहतात. मान्सून कालावधीत ३० टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे हिवतापाबाबत विचार केले असता, संपूर्ण महाराष्ट्रातील पी.एफ मलेरीया ६० ते ६७ टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्हयातील असतात. जिल्हयाची भौगोलीक परिस्थीती अतिविशेष असल्यामुळे हिवताप निर्मुलन करण्याकरीता विशेष उपाययोजनांची आवश्यकता आहे. या करीता शासनाने सन २०२१-२२ या आर्थीक वर्षाच्या पी.आय.पी. मध्ये गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रीय संक्रमण होत असल्यामुळे, हिवतापाचा समुळ नायनाट करण्यासाठी व अतिदुर्गम भागातील अतिजोखमीच्या विशेष विरोधी उपाययोजना राबविण्यासाठी व हिवताप बाधीत रुग्णाचे पूर्ण संक्रमण रोखणेसाठी हिवताप सामुदायीक सर्वेक्षण शोध मोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण माहे १ ते १५ डिसेंबर २०२२ या तारखेपर्यत घेण्याचे मागदर्शक सुचना दिलेल्या आहेत. विशेष हिवताप सर्वेक्षण मोहीम ही जंतूभार १० व त्यापेक्षा जास्त प्रा.आ.केन्द्रात राबविण्यात येणार आहे. यासाठी ६ तालुके, १६ प्रा.आ.केन्द्र, ११५ उपकेन्द्र व ६७२ गावाची निवड करण्यात आली असून ६७२ गावातील ५४२ आशा वर्कर व ५७ हंगामी क्षेत्र कर्मचारी मिळून सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. या मोहीमेत ८७८९५ लोकांचे रक्तनमुने व १५४०९६ लोकांचे आर.डी.के. व्दारा तपासणी होईल. हिवताप दुषीत रुग्णांना प्रा.आ. केन्द्रातील आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार करण्यात येईल. या मोहिमेची पूर्व तयारी करण्यासाठी जिल्हा स्तरावरुन डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी

गडचिरोली, डॉ. संतोषकुमार जठार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. बेले माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ. विनोद मशाखेत्री जिल्हा सर्वेक्षण अधिकारी व डॉ. कुणाल मोडक जिल्हा हिवताप अधिकारी यांनीसर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले तसेचसर्वऔषधी व साहित्य पुरविण्यात आले आहे. प्रा.आ. केंद्र स्तरावर सर्वेक्षण करणाऱ्या आशा व हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचे प्रशिक्षण जिल्हा स्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे कडून घेण्यात आले. त्या अनुषांगाने आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाचे वतीने दिनांक ०१/१२/२०२२ ते

१५/१२/२०२२ या कालावधीत हिवताप शोध मोहीम राबविण्यात येत असून हि मोहिम यशस्वी करण्यासाठी कुमार आर्शीवाद मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली व डॉ.श्याम निमगडे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here