
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते यांचा जिल्हा महिला काँग्रेस च्या वतीने सत्कार

गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते यांचा जिल्हयासाठी त्यांच्या सर्जनशीलतेचा उपयोग होईल व जिल्हा आरोग्याचे प्रश्न त्वरित सोडवल्या जातील अशी अपेक्षा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर व अन्य पदाधिकार् यांनी त्यांची भेट घेऊन डॉ. खंडाते यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
सत्कारा प्रसंगी महिला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जिल्हाध्यक्षा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ॲड. कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सौ. अर्पणा खेवले, सौ.आशा मेश्राम, सौ.शीतल आंबोरकर, सौ रिता गोवर्धन तसेच डॉ. माधुरी किल्नाके, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बजरंग दुर्वे, डॉ. प्रशांत पेंदाम इत्यादी उपस्थित होते.
जिल्हातील आरोग्य सेवेच्या समस्या व उपाय योजना या संदर्भात इथे चर्चा करण्यात आली. नवनियुक्त शल्यचिकित्सक यांच्या आगमनाने आरोग्य सेवेत नवचैतन्य निर्माण होईल असे मनोगत यावेळी ॲड. कविता मोहरकर यांनी व्यक्त केली