जिल्हा नियोजन समितीसह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या लवकरच होणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

55

जिल्हा नियोजन समितीसह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या लवकरच होणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पद व जबाबदारी देवून काम करण्यासाठी प्रोत्साहित करा.

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी केली चर्चा

गडचिरोली(मुंबई)gadchiroli :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच्या समित्या रद्द करण्यात आलेल्या असल्याने जिल्हा नियोजन समिती जिल्हा व तालुका स्तरीय समित्यांची नव्याने रचना करून या समित्यांवर आपल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशअध्यक्ष माजी मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन केली.

लवकरच या समित्यांची रचना करणार येणार असल्याची माहिती यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमदार महोदयांना दिली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री (संघटन) रवींद्रजी ओलारवार भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री अरुणभाऊ हरडे प्रामुख्याने उपस्थित होते.समाजातील, सर्वसामान्य लोकांचे लहान लहान प्रश्न अडचणी या समितीच्या माध्यमातून समितीचे पदाधिकारी व सदस्य सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्व समित्या रद्द करण्यात आलेल्या असल्याने या नवीन समित्यांची नियुक्ती लवकरात लवकर करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती या चर्चेच्या वेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here