
जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली च्या वतीने शेतकऱ्याच्या बांध्यावर मुंडन आंदोलन

शेतकऱ्यांनी मुंडन करत केले राज्य सरकारचा निषेध.
गडचिरोली:-जुलै — ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने व मेडिगट्टा धरणामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि दुबार- तीबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले व अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर कोसळले जिल्ह्यातील शेतकरी कधी नव्हे तर आत्महत्या करायला लागले तरीही निद्रा अवस्थेत असलेल्या राज्यातील ED सरकारने अद्याप शेतकऱ्यांना आश्वासनाच्या पलीकडे काही देऊ शकले नाही अश्या सरकारचा निषेध करण्याकरिता व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, पूरपीडितांकरिता रब्बी हंगामात तत्काळ बियाणे पुरविण्यात यावे, पूरग्रस्तांनी घेतलेले पीक कर्ज माफ करण्यात यावे या सारख्या अनेक मागण्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात शिवणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, प्रमोद भगत, कविता भगत, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, अब्दुल पंजवाणी, सुभाष धाईत, जितेंद्र मुनघाटे, निशा आयतुलवार जावेद खान, दिलीप भांडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
तर किसन उडान, सदाशिव सातपुते, गजानन बालापूरी, विठोबा उडान, राजू मेश्राम, खुशाल पोरटे, दिलीप चुधरी, खुशाल लोणारे, प्रल्हाद गेडाम, योगाजी गेडाम, देवराव मेश्राम, एकनाथ शिडाम, दिनाजी भोयर, चरणदास पिपरे, वासुदेव गेडाम, देवानंद कुमरे हितेश निखुरे, बाजीराव निकुरे, अनिल गेडाम सह
शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाई होत मुंडन करुन आंदोलनात सहभागी झाले.