जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती

69

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती

 

गडचिरोली,()दि.06: र्जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली आणि साथी (SATHI) यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती माहिती देण्यात आली तसेच कारागृहातील कैदांकरीता खेळण्याचे साहित्य (बँड मिटंन) वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारागृह अधिक्षक,आनंद कोकाटे, कारागृह वैद्यकीय अधिकारी,डॉ.भडके,जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जि.सा.रुग्णालय,महेश भांडेकर,साथी (SATHI) चे किशोर रुद्रकार तसेच कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जि.सा.रुग्णालय,समुपदेशक,श्रीकांत मोडक,यांनी केले. तर आभार प्रदर्शन कारागृह अधिकारी, श्री.चोपकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here