जंगल कामगार सहकारी संस्थांना कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे वाटप

85

जंगल कामगार सहकारी संस्थांना कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे वाटप

 

गडचिरोली, दि.01 : सन 1947 साली तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांनी जंगल मक्तेदाराकडून आदिवासी समाजाची होणारी पिळवणुक व शोषण थांबावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, आदिवासी समाजातून नेतृत्व निर्माण होवून या समाजाला मानवतेची वागणूक मिळावी व त्यांचे करवी समाजाच्या उध्दाराचे कार्य व्हावे, या करीता शासनाने धोरणात्मक दृष्टीकोणातून जंगल कामगार सहकारी संस्था चळवळीचा स्विकार केला आहे. सद्यास्थितीत गडचिरोली जिल्हयात 26 संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना वनविभागाचे कार्यआयोजनेत समाविष्ट असलेली कुपे तोडीस वाटप करण्यात येतात. त्यापासून संस्थांचे सभासदांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून त्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत होते.

 

जंगल कामगार सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे वाटपाबाबत दिनांक 30.11.2022 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) म.रा. नागपूर व वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली वनवृत्त यांचे कार्यालयात व्हि.सी द्वारे सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी श्री. पी. कल्याण कुमार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) म.रा नागपूर होते व प्रमुख मार्गदर्शक श्री. डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली, श्री. उमेश शर्मा, उप वनसंरक्षक (संसाधन उपयोग) नागपूर श्री. मिलेश दत्त शर्मा, उप वनसंरक्षक गडचिरोली, श्री. राहुल सिंग टोलीया, उप वनसंरक्षक आलापल्ली श्रीमती. पुनम पाटे, उप वनसंरक्षक सिरोंचा हे उपस्थित होते. तसेच श्री. खटरे, कार्यकारी संचालक म.रा नागपूर, श्री. पि. के. झाडे सचिव जिल्हा संघ व जंगल कामगार सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद हजर होते.

 

गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत गडचिरोली, आलापल्ली व सिरोंचा या वनविभागात मंजुर कार्यआयोजनेनुसार तोडीस योग्य असलेली कुपे जंगल कामगार सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्राबाहेर येत असलेली एकुण 47 कुपे श्री. पी. कल्याण कुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) म.रा नागपूर यांचे अध्यक्षतेखाली तसेच डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली यांचे द्वारे वाटप करण्यात आले. त्यातून 15513.772 घ.मी. ईमारती लाकुड व 22491.00 जळावु बिट अपेक्षित आहे. तसेच त्यापासुन 38.77 कोटी चा महसुल अपेक्षित आहे.

 

जंगल कामगार सहकारी संस्था यांनी सन 2022-23 वर्षाकरीता मागणी केल्यानुसार जिल्हा संघ जंकास, जिल्हा उपनिबंधक, उप वनसंरक्षक (प्रा) गडचिरोली, आलापल्ली, सिरोंचा व वनसंरक्षक (प्रा) गडचिरोली वनवृत्त यांनी शिफारस केल्याप्रमाणे शिफारशीस अधिन राहुन गडचिरोली, आलापल्ली व सिरोंचा वनविभागातील तोडीस उपलब्ध कुपे जंगल कामगार सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे कुप वाटप अहवालाचे वाचन करुन त्यांचे नावे सदर कुपाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जंगल कामगार सहकारी संस्थेच्या एकुण 26 संस्थेच्या 4900 सभासदांना रोजगार प्राप्त होणार आहे. तसेच इमारती वनोपजाची छापणी करणे, इमारती वनोपजाची तोड करणे, इमारती माल वाहतुक करणारे वाहन चालक, कुप डेपोवरील चौकीदार, पहारेकरी अश्या विविध कामानुसार हजारो कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कुप वाटप प्रक्रिया लवकर पुर्ण झाल्यामुळे वनसंरक्षक (प्रा) गडचिरोली यांनी जंकास संस्थ्‌ेला कुप ताबा लवकर घेवुन काम लवकरात लवकर पुर्ण करुन माहे मार्च अखेरपर्यत विक्री डेपोवर इमारती वनोपज वाहतुक करुन लिलाव प्रक्रिया पुर्ण होण्याच्या दृष्टिने काम करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

 

प्राप्त महसुलातून खर्च वजा जाता शिल्लक निव्वळ महसुलातून 20 टक्के वाटा हा जंगल कामगार सहकारी संस्थांना मिळतो. त्यापैकी 10 टक्के वाटा संस्थांचे सभासदांना कल्याणकारी कामासाठी वाटप करण्यात येतो. त्यामुळे संस्थेचे सभासदांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

 

तसेच दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी लवकर कुप वाटपाची प्रक्रीया पुर्ण झालेली असल्यामुळे जंकास संस्थेतील कर्मचाऱ्यांना हिवाळयात कुप तोडीचे कामे पुर्ण करता येईल. उन्हाळयात जंगलात काम करण्याची गरज भासनार नाही. उन्हाळयातील उष्णतेचा त्रास होणार नाही, संस्थेतील सभासदांची कार्यक्षमता वाढेल तसेच प्रकृतीही ठिक राहील. कुप वाटपाची प्रक्रीया लवकर पुर्ण झाल्यामुळे जंकास संस्थेच्या पदाधिकारी/कर्मचाऱ्यांनी वन विभागाचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here